मुलाखत – केदार कुलकर्णी

11 03 2009

तर दोस्तानो, तुम्हाला माहित आहेच की कोल्हापूरला केदार कुलकर्णी याने नुकत्याच झालेल्या ‘झी गौरव’ समारंभात ‘गंध‘ या चित्रपटासाठी उत्कृष्ट कलादिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. सांगायची गोष्ट अशी की केदारदादा हा देवल क्लबचा कलाकार, आणि मी देखील क्लबचाच. त्यामुळे, माझ्या या दोस्ताला सन्मान मिळाल्याचा मला विशेष आनंद. तसे आम्ही गेल्या 1 महिन्यात भेटलेलो नव्हतोच. त्यामुळे, काल त्याला भेटल्यावर त्याची एक अनौपचारीक मुलाखत घेतली. मिसळपाववरच्या दोस्तांसाठी ही मुलाखत सो एक्स्क्लुजीव केदार कुलकर्णी विथ विनायक पाचलग

मी – केदारदादा, पहिल्यांदा या पुरस्काराबदद्ल तुझे अभिनंदन, मला सांग, तुला
स्वतःला बक्षीस मिळेल असे वाटत होते का? महत्त्वाचे म्हणजे नितीन देसाई, सुमित्रा भावे अशा दिग्गजांची स्पर्धा असल्याने दडपण होते का?
केदार – अरे, बक्षीस मिळेल, याची अपेक्षाच नव्हती केली. खरतरं, नॉमिनेशन
मिळाल्यावरच आपल काम एप्रीसीएट झालं. म्हणून समाधानी होतो. पण, इथपर्यंत आलोय म्हणटल्यावर बक्षीस मिळावे. अशी, थोडीशी, मनाच्या कोपर्‍यात इच्छा होतीच. आणि, ती कोणाला नसते. अरे, तुला पटणार नाही. नाव घोषीत झाल्यावर 2 मिनिटे मी स्तब्ध होतो. माझे मलाच काही कळत नव्हते. माझ्या नकळत मी रंगमंचावर गेलो आणि ट्रॉफी घेऊन परत आलो. मग, 5 मिनिटानी भानावर आलो. त्यामुळे, ते सगळे काही वेगळंच होते.

मी – बरं, मला एक सांग. तुला हा पिक्चर कसा मिळाला? आणि, आता विचार
केल्यावर तुला हे यश का मिळाले असे वाटते.
केदारदाः- अरे, ती पण मजा आहे. तुला माहित आहे बघ. 2 वर्षापुर्वी आपण क्लबमार्फत ‘छोटयाश्या सुट्टीत’ हे नाटक बसवले होते. या नाटकाचा लेखक सचिन कुंडलकर होता. खरेतर, हा विषय हाताळणारी अख्ख्या महाराष्ट्रातली आपली दुसरी संस्था. आणि, हा प्रयोग राज्य नाटय स्पर्धेत नावाजला गेल्यावर त्याचा एक शो पुण्यात ठेवला होता. तेव्हा सचिन आलेला. मग, त्यावेळच्या चर्चेत त्याने तु काम करणार का विचारले आणि मी चित्रपट केला. आणि, ‘गंध’ चं वैशिष्टय म्हणशील तर गंधमध्ये आम्ही दृश्य चित्र अनुभवातुन प्रेक्षकांना गंधाचा, वासाचा फील द्यायचा प्र यत्न केला आहे. तेसुध्दा तीन टोकाच्या कथानकातून 1) पुणेरी वाडा संस्कृतीतलं कुटुंब – लग्न 2) तर दुसरे एक मॉडर्न फॅशन फोटोग्राफर आणि तिसरं म्हणजे एक प्युअर कोकणी घर. या तिन प्रकारच्या कथा आम्ही योग्यत-हेने जोडू शकलो आणि विशेष म्हणजे, काही प्रसंगानंतर लोक म्हणतात, ”हा आम्हाला बघताना तो वास आल्याचा भास झाला, जाणीव झाली.” कदाचित या वैशिष्टयामुळेच कदाचित आम्ही ‘हरिशचंदाची फॅक्टरी’ या प्रचंड अभ्यासाने बनवलेल्या चित्रास मागे टाकू शकलो.

मी – बरं केदारदा, तुला ज्यासाठी आवार्ड मिळाला त्या कलादिग्दर्शनाबद्दल काही सांग कारण माझ्यासह ब-याच लोकांना
अजून ‘कलादिग्दर्शन’ म्हणजे काय तेच माहित नाही. नक्की हा काय प्रकार आहे आणि तुझा हा पहिलाच प्रयत्न होता का?
केदारदा – अरे विन्या, मराठी चित्रपटाबाबत बोलायचं तर कलाकार, त्यांचे कॉस्टयुम आणि
डायलॉग सोडले तर बाकी सगळयाचा समावेश कलादिग्दर्शनात होतो. अरे, पिक्चर लिहिताना त्याचा एक ग्राफ दिग्दर्शकाच्या डोळयात असतो. जो आम्हाला माहित असतो. मग त्यानुसार तसं Environment तयार करावं लागतं. त्या दृश्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. थोडक्यात सांगायच तर, तुला म्हटलं ऑफिसचा सेट लाव. तर, आत्ता आपण बसलोय, इथं पण शुटींग करता येतचं की. पण, त्यावेळी प्रसंग कोणता, मग कशी रचना करता येईल, कोणती रंगसंगती वापरावी लागेल. याचा विचार म्हणजे कलादिग्दर्शन. थोडक्यात म्हणजे कंटेटला एक्झीक्युट करणे. आणि यातलं कौशल्य म्हणजे आपल्याला ग्राफ माहित असतो. पण दिग्दर्शक कोणत्या ऍंगलने तो शुट करणार हे माहित नसतं. आयत्यावेळी, ते बदलू शकतं. म्हणूनच, सर्व बाजून ते प्रीपेअर असावे लागते. आणि, मी पहिल्यांदा ‘ॠषीकेश मोघे “यांच्याबरोबर ‘अचानक’ साठी असिस्टंट म्हणून काम पाहिले. पण, इनडिपेंडंट हा माझा पहिलाच प्रयत्न. म्हणूनच, जास्त आनंद आहे.(यावेळी केदारने खुप माहिती दीली पण ती विस्तारभयाने ती इथे देत नाही आहे)

मी – बरं, आता थोडं तुझ्याबदद्ल? तु या क्षेत्रात कसा आलास? आणि आत्तापर्यंतचा
तुझ्या प्रवासाबदद्ल थोडे सांग?
केदार – अरे मी पहिल्यांदा नाटकात आलो ते आर्किटेक्चरच्या पहिल्या वर्षात म्हणजे
जवळजवळ 15 वर्षापूर्वी. त्यावेळी माईम (मुकाभिनय) केले होते. तिथुन मग सुरूवात झाली. 4-5 वर्षे महाविद्यालयात एकांकिका, नाटके केली. मग त्यात बक्षिसे वगैरे मिळू लागल्यावर वेगवेगळे सुरू केले. यानंतर 2000 सालापासून आजपर्यंत मी देवल क्लबशी निगडीत आहे.

मी – बरं मग या काळात तु केलेले महत्वाचे नाटय्प्रयोग, बक्षीसे कोणकोणती?
 तसं म्हणशील तर 2003-04 साली मी कॉलेजच्या मुलांना बरोबर ‘येत्या काळोखापर्यंत’ हे नाटक लिहिले आणि बसवले होते. त्याला आणि क्लबमार्फत म्हणशील तर मी ”भरणी भरपाई”, ”छोटयाश्या सुट्टीत” ” एक युध्द्….” अशी अनेक नाटके केली. यात सर्वात वेगळे होते ते भरणी भरपाई. कारण यात फक्त डॅडो आणि स्टेप्स वापरून आम्ही 10 ते 11 वेगवेगळी ठिकाणे दाखवायचा प्रयत्न केला होता. आणि सर्वांत गाजलेले म्हणशील, तर ”छोटयाशा सुटटीत” या नाटकाला राज्य नाटय स्पर्धेत मध्ये 4 पुरस्कार मिळाले होते. त्याचे ठिकठिकाणी प्रयोगही झाले. यातले 2 पुरस्कार मला होते.

मी – बरं मला सांग, यातला तुला सर्वांत जास्त चॅलेंजिंग, आवडलेला प्रयोग कोणता?
केदार – तसं म्हणशील, तर मला स्वतःला खूप चॅलेंजिंग वाटलेला वा म्हणूनच आवडलेला
म्हणजे ‘माझ्या प्रीय मित्रास “यात मी 70 वर्षाच्या माणसाची भूमिका केली होती. ते फार अवघड होते. आणि, विशेष म्हणजे ‘आराधना’ करंडक मध्ये ते नावाजलेदेखील गेले.

मी – बरं केदारदा, मला सांग तुला मी डिरेक्शन करताना पाहिलयं. तुला अभिनयाचे
ऍवॉर्ड मिळालेले आहेच. तु एकदोनदा म्युजिक केलेले आहेस आणि आता आर्ट डिरेक्शन? या सर्व क्षेत्रात तु वावरतोयस. पण, यातले तुला सर्वांत जास्त काय आवडते?

केदार – अं, खरं सांगायचं तर डिरेक्शन, कारण त्यात तुमच्या सर्व कल्पनाना वाव मिळतो. त्यामुळे, माझी डिरेक्शनला फर्स्ट प्रायोरीटी असते. त्यानंतर आर्ट डिरेक्शन. कारण, तो माझ्या पेश्याशी रिलेटेड आहे. आणि सर्वात शेवटी, जर कोणीच उपलब्ध नसेल तर ऍक्टिंग.

मीः- बर, आता याच अनुशंगानं आणखी एक प्रश्न? तुला स्वतःला काय करायला आवडते,
नाटक का चित्रपट? आणि का?
केदार – खरे सांगायचे तर, दोन्ही माध्यमे आपापल्या जागी योग्य आहेत. पण मला म्हणून
विचारशील तर 200% नाटकच. कारण नाटकात थेट संवाद साधता येतो. महत्त्वाचे म्हणजे स्वतःला Explore करता येते. जज करता येते. चित्रपट जास्त लोकांपर्यंत पोहोचतो हे खरं. पण, त्यावेळी दडपण असते आणि महत्त्वाचे म्हणजे बदलाची संधी पण मिळते ती नाटकात. म्हणजे, आपल्याला वाटले की हा संवाद असा घेतला तर जास्त इफेक्टिव ठरेल. पण, चित्रपटात तसे नाही. एकदा शुट झाले की संपले. त्यामुळे जीवंत अनुभव देणारे नाटक हेच चांगलं.

मी – बर आता एक वेगळा प्रश्न, तु आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनर आहेस? याचा
तुला या क्षेत्रात फायदा होतो का?
केदार – हो. नक्कीच होतो ना.

मी – खरतरं तू पूर्णवेळ कलाकार नाहीस? व्यवसाय, कुटुंब, आणि कला हे सगळं तु कसं
मॅनेज करतोस? आणि पुढेमागे पूर्णवेळ कलाकार व्हायचं ठरवलं आहेस का?
 अरे, खरतरं तारेवरची कसरत करावी लागते. पण, आवड असली की सवड मिळतेच. हा, पण सॅक्रीफाईज करावे लागते. त्याला पर्याय नाही. आणि भविष्याबाबतीत म्हणटलेस तर अजुन काय ठरवलेले नाही. इथे (कपाळावर) जे लिहिले असेल तसे होईल. पण, जर व्यवसाय व कला अशी निवड करायची झाल्यास व्यवसायच निवडीन. पण, जर चान्स असेल, तशी संधी आली तर कलेबाबत. पण, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न असतोच ना.

मी – बरं आता एक महत्त्वाचा प्रश्न ? यावेळी तुझ्यासह कोल्हापूरच्या एकूण तिघांनी ‘झी
गौरव’ मिळवला, तर एकाने ‘फिल्मफेअर’ मिळवले. यामुळे, पुणे मुंबई आणि कोल्हापूरसारखी गावे यांमधील दरी कमी होत आहे. असे वाटते का?
केदार- याबाबतीत म्हटलं तर ‘हो’ आणि म्हटलं तर ‘नाही’. कारण मुळात म्हणजे कलेच्या प्रांतात असा भेदभाव करू नयेत. कारण, ते या क्षेत्राला मरक आहे. आणि एखाद्याने काम करायचे ठरवले, तर तो ते मिळवतोच. हा, पण एक गोष्ट आहे. पुर्वी, साधारण महानगरीय भागातील लोकांना पुरस्कार, प्रसिध्दी मिळायची. पण, ते चित्र मात्र आज नक्की बदललयं. पुर्वी, काम मिळवायला मुंबई गाठायला लागायची. मात्र, आता लहानसहान गावातून निर्मिती घडत आहे. याशिवाय ‘संजय मोहिते’ ने मुंबईत जावून नाव कमावलेच की. त्यामुळे ही दरी कमी होत आहे. आणि, याचे कारण काय आहे माहित आहे का? आपण, आपल्या कोसापुरते मर्यादित राहतो. आपल्याकडची मंडळी आपले प््राश्न मांडतात. तर महानगरातले त्यांचे. आणि, ते प्रश्न एकमेकांना रूचत नाहीत. म्हणून ती दरी निर्माण होते. अरे, आज कोल्हापूरातल्या गुंडागिरीवर बनलेलं ‘युज ऍन्ड थ्रो ‘ इथे यशस्वी ठरतं. पण, मुंबईत मार खातं, कारण तिथं तो प्रश्नच नाही आहे. मग, त्यांना काय कळणार. पण, आजकाल चित्र बदलतयं. लोक एकमेकांना सामावून घ्यायला लागले आहेत. सामान्यांच्या जीवनावर सहज नजर टाकली तरी चित्रपट जमून जातो, हे ‘स्लमडॉग’ ने दाखवून दिलयं. तो पिक्चर चांगला का वाईट हा भाग अलहिदा! पण, हा बदल घडून आलाय हे महत्वाचं.

मी – मग, यात प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका बजावतात का?
केदार – हो नक्कीच, मध्ये आपण चर्चा केली होतीच की यावर. अरे, आजकाल विविध
नियतकालीकातून असे चित्र रंगवलं जातयं की रंगभूमी फक्त पुण्या-मुंबईतच. अरे, त्यांचं कार्य मला मान्य आहेच. त्यांनी जे उत्तम रसिक घडवण्याचं काम केलयं त्याला सलाम. पण, आजकाल अशा बेटांच्या स्वरूपात कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, कणकवली यांचे जे उपक्रम चालतात त्याबदद्ल किती लिहिले जाते. गेले 125 वर्षे आपला क्लब या क्षेत्रात उत्तम काम करतोय, त्याची तरी किती दखल घेतली गेली. हा, इथे आपलीही चूक आहेच. आपण कोषातून बाहेरच पडत नाही. आपण, एकदा तरी पुण्या-मुंबईत गेलोय का नाटकं बघायला. त्यामुळे आपण कोषात राहतो, प््रासिध्दी करत नाही. आणि, कोल्हापूरसारख्या गावात अजून प्रेक्षकवर्ग तयार झालेला नाही. यामुळे नाटक मार खाते. पण, हे चित्र बदलणे हे रंगभूमी, चित्रपट याबाबत महत्त्वाचे आहे. नाटक, चित्रपटाबाबत हिच स्थिती आहे. पण, जर का हे चित्र आपण बदलले ना. तर या क्षेत्राला सोनेरी दिवस आहेत हे नक्की.

मी – बरं, आता शेवटचा प्रश्न. पहिल्यांदा मला या क्षेत्रातल्या तुझ्या आवडत्या व्यक्ति (खरेतर हा प्रश्न आधीच विचारायच होता पण तसा प्रसंग न आल्याने आत्ता विचारला)
सांग आणि तु आमच्यासारख्या नवोदितांना काय सांगशील, तेदेखील सांग.
केदार – माझे आवडते म्हणशील, तर मला नट म्हणून अमोल पालेकर आवडतात. आणि
कलादिग्दर्शक म्हणून नितीन देसाई. नितीन देसाईंचे काम तर उत्तम आहेच. पण, त्यांनी कलादिग्दर्शनाला जे ग्लॅमर मिळवून दिलं आहे. त्या त्यांच्या कामाला तोड नाही. आणि, मी काही उपदेश देण्याइतका मोठा नाही. माझी पण सुरवातच आहे. फक्त, तुमच्यापेक्षा 5-6 पावसाळे जास्त बघीतलेत. म्हणून, आणि एक मित्र म्हणून इतकेच सांगीन की, नाटक करा पहिल्यांदा, ते सिरीअसली करा, स्वतःला शहाणे समजून कुंपणात बांधून घालू नका.आणि शेवटपर्यंत शिकत रहा इतकेच

मी – केदारदादा, पुन्हा एकदा अभिनंदन आणि आभार.
(सदरची मुलाखत केदारच्या ऑफीसमध्ये आम्ही घेतली त्याच्याजवळच राजाभावुच्या भेळेची गाडी असल्याने आम्ही भेळ आणली होती ,एवढया वेळात आम्ही आणलेली राजाभाऊची भेळही संपलेली. मग, तो त्याच्या साईटवर गेला, मी घरी आलो आणि ही छोटेखानी मुलाखत संपली)

मुलाखत व शब्दांकन
विनायक पाचलग




आनंद

11 03 2009

तर दोस्तानो, कालचीच गोष्ट , काल संध्याकाळी दैव योगाने मला एक शास्त्रज्ञ लेखकाना म्हणजेच मोहन आपटे याना भेटायची संधी मिळाली,जवळ जवळ अर्धा पावुण तास आम्ही दोघे तीघेच लोक होतो त्यामुळे मनसोक्त गप्पा मारायची संधी मिळाली.खरेतर ती संपुर्ण चर्चा खगोलशास्त्रावरच होती पण तो एक तास म्हणजे माझ्या जीवनातील काही सर्वोत्तम तासांपैकी एक असे म्हणावे लागेल. खरेच या माणसाबद्दल काय सांगावे.प्रचंड बुद्धीमत्ता ,अफाट वाचन आणि त्यामुळेच कलीयुगाची सुरवात ते आत्ताची सॉफ्टवेअर्स यापर्यंत झालेली चर्चा ,क्षणाक्षणाला बदलणारे विषय आणि प्रत्येक मुद्द्यावर त्यांचे तेवढेच अभ्यासपुर्ण भाष्य,वय ,अनुभव आणि पात्रता यांचा विचार न करता माझ्याशी मोकळेपणाने केलेली चर्चा.शिवाजी महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग ,त्यांचे विवेचन आणि त्या ६ प्रसंगात असणारी समान खगोलशास्त्रीय स्थिती हे सोप्या शब्दात समजावणे ,हे सांगताना विविध पुस्तकांचा ,व्यक्तींचा होणारा उल्लेख, प्रत्येकाचे कार्य ,मी (विनायक पाचलग)लोकसत्तातील लेख वाचतो म्हणल्यावर लिखाणावर चर्चा॑,मनाच्या कुपीतले या सदराबाबत सांगीतल्यावर नक्की पाहीन हे आश्वासन आणि आम्ही संगणक तत्पर असतो हे सांगीतल्यावर स्कायमॅप प्रो या उत्तम प्रणालीबद्दल त्यानी दीलेली माहिती आणि माझ्या एका न एका प्रश्नाला त्यानी दीलेले तेवढेच उत्तम उत्तर यामुळे तो १ तास कसा गेला ते कळलेच नाही आल्यावर ते काय काय बोलले ते शब्द आठवायचा२ तास केलेला प्रयत्न माझ्यासाठी हा संपुर्ण वेगळा अनुभव होता .बरोबर १.२५ वर्शापुर्वी त्यांचे शाळेतील व्याख्यान हुकले म्हणुन मी प्रचंद हीरमुसलेलो होतो आणि आज मात्र त्यांच्याशी एकटेच १ तास बोलत होतो .ज्यांच्या पुस्तकातुन आम्हाला पहिल्यांदा अवकाश म्हणजे काय ते समजले त्यानीच मला ” मला उत्तर हवे आहे “या पुस्तकाची नवी प्रत स्वत दाखवली ,त्यानी दाखवलेला स्लाइड शो मी थोडाफार मिळवला होता पण आज तेच त्याबद्दल सांगत होते.खरच आनंद आनंद म्हणजे काय याची अनुभुती मला काल आली

पण जेव्हा मन शांत झाले तेव्हा डोक्यात काही वेगळेच यायला लागले पहिली गोष्ट आली ती म्हणजे की .अरे एवढा आनंद आपण मिळवला त्यासाठी आपणाला एक पैसाही खरच करावा लागला नाही हे आपले भाग्य म्हणायचे नाहीतर काय आणि इथेच संदीपचे बोल आठवले

“की खरीखरी सुखे राजा मिळती फुकट……….”

.खरेतर एखादी व्यक्ती ,तीचे विचार याबद्दल मत मतांतरे असतीलच की मी ज्याना मोठे मानतो त्यांच्याबद्दल इतरांची भिन्न मते असतीलही पण ज्याना आपण फक्त पाहण्याची इच्छा केली ती व्यक्ती आज प्रत्यक्ष भेटते तो माझ्याद्रुष्टीने नक्कीच अतीव आनंदाचा क्षण होता.असे अनेक विचार इथे मिपावर खरडाखरदी करताना डोक्यात भुंग्या सारखे येत होते

आणि इथेच डोक्यात विचार चक्र चालु झाले कीकी होय हाच खरा आनंद,जो आनंद मिळवण्यासाठी आपण आयुश्य घालवतो त्यातलाच हा काही हीस्सा .आपण जरी मोठे नसलो आपली जरी लायकी नसली तरी मोठ्या व्यक्तीना पाहणे ,त्यांची ओजस्वी वाणी ऐकणे (ऐकायला मिळणे.) त्यांचा प्रचंड अभ्यास ,प्रचंद यशानंतर जमीनी वर असणारे पाय पाहणे त्यातुन शिकणे हा मानसीक आनंदच नाही का!,खरेतर जगण्याचे प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते पण माझ्याबाबत म्हणाल तर जीवनात आल्यावर हा असा आनंद मिळाला म्हणजे खरे जीवनाचे सार्थक झाले . मग आमचे आम्ही आनंद म्हण्जए काय याचा शोध मनात सुरु केला आणि तेव्हा लक्षात आले कीएखाद्या परिक्षेत यश मिळवणे हा खरा आनंद नाही. तो आनंद आहे पन तो सर्व समावेशक नाही ,तिथे राजकरण असते, भविश्याची चिंता असते.खरा आनंद असा की जीथे आपले चित्त तल्लीन होते आपण आपल्या चिंता विसरतो थोडक्यात आपल्या आत्म्याला समाधान लाभते.बेभान होवुन आपल्या फूट्बॉल संघाची मॅच पाहणे ,किंवा त्यात खेळताना गोल करणे हा खरा आनंद्,एखादा लेख लिहिल्यावर तो स्वतःलाच आवडणे हा खरा आनंद,एखादे लिखाण वाचुन जेव्हा ८० वर्शाची व्यक्ती घरी येते कोणतीही ओळख नसताना तिच्या शाळेतल्या आठवणी सांगते हा खरा आनंद ,एखाद्या शांत वेळी एकटेच कोणत्याही चिंतेशिवाय मंद गाणी ऐकणे आणि मनाचा शोध घेणे हा खरा आनंद्,सकाळी सकाळी लोकसत्तातले २ फुल एक हाफ वाचल्यावर मनापासुन हसणे हाच खरा आनंद ,कींवा एखादा मित्र जवळ जवळ १० वर्षानी आपणाला भेतल्यावर आपळ्याला ओळखतो आणि आपण गप्पंचा फड जमवतो तो खरा आनंद कींवा एखद्द्या दीवशी आपल्या आवडत्या हॉटेलात जावुन पाहिज ए ते पहिजे तेवढे खाणे हा खरा आनंद्,किंवा एखादे नाटक बिनधास्त पणे पाहणे हा खरा आनंद किंवा जेव्हा एखादी मैफल वा एखादा प्रसंग झाल्यावर आपले हात जेव्हा आपोआपच एकमेकावर पडतात तेव्हा वाजणार्‍या टाळया ,हा एक श्रोता म्हणुन आपल्याला मिळणारा सर्वोत्क्रुष्ट आनंद ,आणि आपण जरकलाकार वगैरे असु तर एक उत्तम कलाकृ ती केल्यावर जेव्हा स्वत;लाच समाधान वाटते तोच आपला खरा आनंद .शिवाजीराव सावंतसासारख्या लोकांचे भाशण बेभान होवुन ऐकणे हा एका श्रोत्याचा आनंद आणि महत्वाचे म्हणजे भावनेने जोडलेली माणसे जेव्हा हक्काने आपल्याला चांगल्या वा वाइट प्रसंगात बोलावतात तो सामान्य माणसाचा खरा आनंद ठेवण्याजोगा,जस जसा मी विचार करायला लागलो तस तसे मला अशा अनेक गोश्टी आठवत गेल्या की जेथे आपणाला खरा आनंद सापडतो आनंदाचे गाव म्हणजे काय ते समजते.

आणि महत्वाचे म्हणजे जेव्हा मी नीट विचार केला तेव्हा मला समजते की या आनंदासाठी आपणास ना पैशाची गरज असते ना सुख सम्रुद्धीची ,जरा रसीकता ठेवली आणि आपल्या शरीरातील इंद्रीयाना आणि या जगात विशेशतः मनाला जीवंत ठेवले की ह्या अनमोल ठेवी आपणाला सहज मिळत जातात्.आणि खरे सांगु की खरे जीवनाचे यश त्यातच आहे.कोणीतरी म्हटले आहे ना की कागदाला अहंकार लागला की त्याचे सर्टीफीक्ट होते ,यार क्या बोला है आणि म्हणुनच यश आपयश ही त्यानंतरची गोष्ट कारण अपयशानंतर यश मिळतेच व यश मिळवल्याक्ष्णी पुढे यश मिळेल का याची चिंता तयर होते .

आणखीन महत्वाचे म्हणजे हे क्षण (यशाचे)आपण स्वतः मिळवु शकतो पण असा आनंद आपण रोज मिळवु शकत नाही किंवा खुप प्रयत्न केला म्हणून मिळेलचे याची खात्री नाही
आर्या आंबेकरच गाणे आपण दर सोमवारी ऐकतो(ऐकायचो)पण जावु द्या सोडा वेगलेच फील देते ,लेख दर आठवड्याला येतात पण एखादाच मनाला भिडतो.पंडीतजींचा लागलेला स्वर काही दररोज ऐकायचे भाग्य मिळत नाही स्वताहुन काही नवीन दररोज सुचत नाही .जेव्हा दैव आणि इच्छा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा अवचीत काही चांगले मिळुन जाते आणि ती भट्टी जमते कारण प्रचारसभेला आणलेल्या माणसांसारखे ते उसने नसते ते उत्स्फुर्त असते ,ही उत्स्फुर्तता तो आनंद देवुन जाते कायमचा…

आणि हो या आनंदाला महत्व काहे कारण तो रोज रोज मिळत नाही.मिपावर रोज जाणारा दीवसही दररोजच वेगळ काही देतो नाही.आणि आपण रोज पाट्या टाकतोच की आणि मी देखील त्याच त्याच रुटीनमध्ये अभ्यास अभ्यास चालु ठेवतोच की .पण असे क्षण येतात आणि जगायला स्फुर्ती देतात, जगणे सोपे करतात म्हणुन त्या क्षणाना सलाम आणि ते घडवुन आणणार्‍या काळाला मनापासुन प्रणाम्.आणि मग आपण पामराने फक्त प्रत्येकाच्या आयुश्यात असे काही क्षण येवोत व त्याचे जीवन सफल होवो अशी प्रार्थना करायची
असो आता टाइपणे थांबवतो कारण आता आनंदाला थांबवतो कारण प्रथेप्रमाणे तो तुम्हाला सांगुन झाला आहेच आणि मलादेखील नेहमीच्या राम रगाड्याला लागले पाहिजे कारण पुन्हा एकदा ते आनंदाचे गाव कधी लागते त्याची वाट पहायची आहे ना असो शेवटी फक्त परवाच्या एका आनंदाच्या क्षणी गाडगीळांचे एक वाक्य ऐकले ते देतो
शब्द समजुन घ्या
शब्द उमजुन द्या
आणि कधीकधी योग्यवेली निशब्दालाही मान द्या

आणि म्हणूनच थांबतो